Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: पराग गोडबोले
वेळ कुठलीही असावी, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा कंपू असावा, सगळे हसत खिदळत असावेत, समोर पाणीपुरीची गाडी दिसावी आणि कोणीतरी म्हणावं, “चला, पाणीपुरी खाऊया…” रम्य संध्याकाळ असावी, सोबत प्रेयसी असावी, हातात हात गुंफलेले असावेत आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच तिने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…” पुन्हा रम्य संध्याकाळ असावी, लग्न नुकतंच झालेलं असावं, नातं अगदी नवथर असावं आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच तिने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…” तशीच एक संध्याकाळ असावी, लग्नाला थोडी थोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षं झालेली असावीत. नुकतंच कडाडून भांडण झालेलं असावं आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच त्याने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…” पुन्हा तशीच एक संध्याकाळ असावी, कातर नाही म्हणणार मी,…
ऑफिसमध्ये एक मीटिंग होती व्हेंडरबरोबर. औपचारिक काम संपलं आणि त्यांनी अचानक विचारलं, “गोडबोले तुमचं गाव कोणतं हो?” मी बावरलो. काय सांगावं या विचारात पडलो, कारण आम्हाला आता गावच नाही. ‘गाव नाही’ असं सांगितलं की, विचारणारा माणूस पार गोंधळात पडतो आणि विचित्र नजरेनं पाहायला लागतो… ‘काय माणूस आहे, गाव नाही म्हणतोय. मुंबईत राहतोय आणि याला गाव कसं नाही?’ असे काहीसे भाव विचारणाऱ्याच्या चेहेऱ्यावर दाटलेले असतात. हा अनुभव वारंवार येतो म्हणून मी दामटून देतो, आम्ही पुण्याचे म्हणून. आजोळ पुण्याचं, शुक्रवारातलं म्हणजे हे काही अंशी खरं असतं आणि या उत्तराने बऱ्याच वेळा प्रश्न विचारणाऱ्याचं समाधान पण होऊन जातं. हेही वाचा – आमचे आबा आणि…
ठाण्याला रिक्षाच्या रांगेत उभा होतो. संथ गतीने सरकणारी रांग आणि कासावीस जनता, हे रोजचंच दृश्य… माझ्या मागे एक पुरुष आणि पुढे एक स्त्री, मध्यमवयीन. ती मोबाइलमध्ये डोकं खुपसून असल्यामुळे, तिच्या पुढची रांग सरकली हे कळलंच नाही तिला. मधे चार-पाच जणांची रिकामी जागा तयार झाली आणि माझ्या मागचा माणूस म्हणाला, “ओ बाई, जरा पुढे सरका…” हे ऐकलं आणि ती पुढे उभी असलेली महिला, नागिणीसारखी फुत्कारली… “बाई किसको बोलताय?” त्या माणसाला काही कळेचना, आपली काय चूक झाली ते. तो म्हणाला, “तुमको ही बोलताय.” दोघांची मजेशीर बम्बईया हिंदी! “मैं क्या बाई जैसी दिख रही हूं तुमको?” मागचा माणूस मराठीत उत्तरला, “आता बाई आहे…
माझी बायको मला वेंधळा म्हणते, हे तर सर्वश्रुत आणि जगजाहीर आहे… आणि मी आहे तसा, हे मी मान्यही केलेलं आहे. असतात काही जण तसे जन्मतःच, त्याला कोण काय करणार? बायको मात्र टेंभा मिरवीत असते… ‘आम्ही गोखले म्हणजे सर्वगुणसंपन्न. इथे गोडबोल्यांकडे येऊन, माती झाली माझ्या गुणांची. कोणाला कौतुकच नाही मुळी आमच्या चटपटीतपणाचं…’ वगैरे वगैरे. आता आयुष्याची जास्त वर्षे अलीकडच्या बाजूला काढूनही, पलीकडचंच कुरण जर अजूनही हिरवंगार भासत असेल, तर कोण काय करणार त्याला? अर्थात, तिच्या वेंधळेपणाचे बरेचसे किस्से आहेत माझ्या पोतडीत, पण ते सांगून, हात दाखवून अवलक्षण कोण करून घेणार उगाचंच! पण कधीकधी माझीही सहनशक्ती संपुष्टात येते आणि मग तिच्या वेंधळेपणाचे…
लेक म्हणते… रात्री का हो लवकर झोपता? दोन-तीन वाजता झोपण्यात गंमत असते, बारा वाजता swiggy वरून pastry मागवण्यात मौज असते. तो आनंदही घेऊन बघा, बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!! रोजच काय हो सहाला उठता? जरा दहा-अकरा वाजेपर्यंत झोपून तर बघा, लोळत पडण्यातला आनंद घेऊन तर बघा, बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!! पोहे, उपमा, थालीपीठच रोज काय खाता? Corn flakes नाहीतर Oats खाऊन तर बघा, बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!! सकाळी उठून चालायला जाता, हलकाफुलका व्यायाम करता, जरा अंथरुणातच व्यायाम करून तर बघा, बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!! सकाळीच आंघोळ का हो करता? रात्रीची आंघोळ सुखाची असते,…
असाच एक शुक्रवार, ऑफिसातला. साधारण अकराचा सुमार आणि सकाळची धामधूम संपवून, हातात कॉफीचा मग घेऊन मी निवांत बसलो होतो. लॅपटॉप झाकून ठेवला होता आणि थोड्याशा कडवट कॉफीचे घोट घशाखाली उतरवत होतो. साहेब सुट्टीवर होते, त्यामुळे जरा टंगळमंगळच सुरू होती सगळ्यांची, त्यातलाच मी एक. कॉफी संपतच येत होती, इतक्यात एक एसएमएस आला, Your account has been credited for Rs 40,000/-. मी चकीत! एवढे पैसे येणं नव्हतंच मला कोणाकडून. तेवढ्यात G pay notification पण आलं, 40,000 रुपये जमा झाल्याचं. महिलेचं नाव दाखवत होतं XXX भोसले. मी विचारात पडलो आणि फोन हातात असतानाच परत एकदा 40,000 जमा झाल्याचा मेसेज आला. एकाच महिलेकडून माझ्या…
प्रत्येक व्यक्तीच्या काही खास आवडीनिवडी असतात. त्यांना काही गोष्टी मनापसून आवडतात तर काही मनापासून नावडतात आणि ही नावड, मग कधीतरी काहीतरी घडतं आणि आवडीत बदलून जाते… माझा एक मित्र आहे, बराच जुना. अगदी शाळासोबती नाही, पण नोकरीच्या ठिकाणी भेटलेला आणि मग त्यानंतर बरीच वर्षे सोबत राहिलेला सुहृदय. त्याच्याही काही अद्भूत आवडीनिवडी. त्यातलीच एक म्हणजे त्याला असलेला कोथिंबीरीचा आत्यंतिक तिटकारा! आता, कोथिंबीर न आवडणारा माणूस तसा विरळाच, पण त्याच्या डोक्यावरचे केस जसे विरळ होत गेले, तसा हा तिटकारा वाढतच गेला… विदर्भातून आलेला म्हणून कोथिंबीरीला धनिया म्हणायची सवय. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर देताना आधीच सांगणार. नो धनिया, म्हणजे एकतर भाजीत कोथिंबीर नको…
ऑफिसमध्ये होते, आम्ही सगळ्याजणी मिळून डबे खाण्यात गुंग होतो, तोच फोन वाजला. लेकाचा होता. साधारण किती वाजता फोन केला की, मी पटकन फोन उचलते, हे ठाऊक असतं त्याला, इतक्या वर्षांच्या सरावाने. तोंडात घास असतानाच फोन घेतला त्याचा… “काय रे?” आम्ही थेट मुद्दयाचं बोलतो. उगाच ‘हॅलो’ वगैरे म्हणण्याच्या भानगडीत वेळ नाही घालवत बसत. “आई, आबांनी अश्वगंधा पावडर आणायला सांगितली आहे.” “काय आणायला सांगितलं आहे?” “अगं, अश्वगंधा पावडर म्हणाले ते…” ऐकलं आणि मला जोरदार ठसका लागला. लालबुंद झाला चेहरा नुसता. ‘पाणी द्या, पाणी द्या तिला,‘चा आक्रोश झाला आणि तब्बल ग्लासभर पाणी रिचवून मी जरा शांत झाले. तसे या अश्वगंधाचे उपयोग ऐकून ठाऊक…
श्रम करणाऱ्याला, घाम गाळणाऱ्याला या जगात कधीच पोटापाण्याची चिंता नसते. मुंबईत तर नाहीच नाही. बरेच परप्रांतीय मुंबईत येतात आणि पडेल ते काम करून, कष्ट करून, जागा मिळेल तिथे राहून, स्वतःचा जीव जगवतात आणि प्रगती करतात. बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, बंगाल या भागातून येणारे हे जत्थे अवघ्या महामुंबईत पसरतात आणि स्वस्त श्रमाची गरज अगदी लीलया भागवतात. मुख्यत्वे, बांधकाम क्षेत्रात यांच्या झुंडी अगदी विनासायास सामावल्या जातात, स्थानिकांच्या नाकावर टिच्चून. यांच्यातलेच काहीजण वेगळे मार्ग चोखाळतात त्यातल्या त्यात कमी कष्टाची कामे! असाच एक अवलिया भेळवाला आमच्या ऑफिसशेजारी असलेल्या पेट्रोलपंपाजवळ दिसतो मला, सदैव. लहानखुरी चण, काळासावळा रंग. गुलाबी, नाहीतर भडक लाल, पिवळा अशा रंगांचे शर्ट…
का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर, बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक. दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर…

