Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: पराग गोडबोले
आज जवळपास दोन वर्षांनी चित्रपटगृहाची पायरी चढताना, अगदी दाटून येत होतं तिला. दोन वर्षांपूर्वीच्या घटना फेर धरून नाचत होत्या तिच्या डोळ्यांपुढे. ती येणारच नव्हती खरंतर, पण जिवलग मैत्रिणीच्या आणि मुलांच्या आग्रहामुळे ती वळली होती, परत त्या दिशेला. मन मारून, इच्छा दडपून जगली होती ती दोन वर्षं… स्वतःलाच दोष देत, दोष नसताना सुद्धा, उगाचच. तो दिवस आठवला, की अजूनही एक विचित्र अशी अपराधाची भावना दाटून येत असे तिच्या मनात. नवरा कंपनीच्या कामासाठी दौऱ्यावर होता. घरात ती, सासूबाई आणि दोन मुलं. मुलगा आठवीत होता आणि मुलगी पाचवीत. रविवारच्या त्या दिवशी, तिचा आणि मैत्रिणीचा मस्त बेत ठरला होता. चित्रपट बघून मग बाहेर खादाडी…
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका कार्यातली. त्या काळी साधारणपणे अशीच असायची सगळी कार्य… तेव्हा बँक्वेट्स (Banquets) नव्हती, साधीसुधी कार्यालयं असायची पुण्यात… लग्न लागलं होतं. दुपार टळली होती. खाशी पंगत पण उठली होती आणि कार्यालयातल्या पाहुण्यांवर श्रीखंडाच्या सुस्तीची दाट साय पसरलेली दिसत होती. जांभयांची आवर्तनं सुरू होती. खुर्च्यांची रिंगणं करून गप्पांचे फड जमले होते. काकवा, मावश्या, माम्या, वहिन्या यांच्या गुजगोष्टी सुरू होत्या. ‘तुला सांगते शांते, परवा किनई कहर केला बाई यांनी…’ असे संवाद ऐकू येत होते. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळत होता. संध्याकाळच्या वरातीला अजून बराच अवकाश असल्याने सगळा थंडा कारभार… काही जण बसल्याजागी पेंगत, वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होते. काही…
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट… संध्याकाळी घरी आल्यावर मी पेपर चाळत असताना, हिने अचानक बॉम्ब टाकला. “ऐक ना, माझ्या मैत्रिणीला तिची स्कूटी विकायची आहे. आपण घेऊया?” “आपल्याला कशाला? एक आहे ना माझी बाइक? डोंबिवलीत कशाला लागतेय?” माझे लगोलग प्रतिप्रश्न, येणाऱ्या संकटाला हुलकावणी देण्यासाठी. “माझ्या मैत्रिणी चालवतात. मला पण वाटतंय शिकावी असं. घेऊया ना, प्लीज.” बाल, राज आणि स्त्री या तीन हट्टांपैकी, एका हट्टाचं भूत आज माझ्या मानगुटीवर बसू पहात होतं. “बघूया,” म्हणत वेळ मारून नेली, पण आता हे भूत सहजी शांत होणाऱ्यातलं नव्हतं, याची मला मनोमन जाणीव झाली. तस्सच झालं अगदी. भुणभूण काही संपेचना. मी तिला म्हणालो, “तुला साधी सायकल चालवता येत…
अलीकडेच मस्त गंमत झाली. तसे घोळ, गमतीजमती माझ्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत, त्यातलीच ही एक नवीन कडी. शनिवारी पुण्याला येण्यासाठी म्हणून ठाण्याहून प्रगती एक्स्प्रेस पकडली, मी पाच वाजता आणि आठच्या सुमारास पुणे स्थानकात उतरलो. अगदी वेळेवर आली गाडी, म्हणून जाम हायसं वाटलं. भाऊ राहतो कर्वेनगरला… त्याच्याकडे जाऊन मग पुढे एका नातेवाईकांकडे जेवायला जायचं होतं. शनिवार असून सुद्धा ऑफिसला गेलो होतो, दिवसभर काम करून जाम दमायला झालं होतं, पण जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ‘कितीही उशीर झाला तरी, तुला यायचंच आहे;’ हे आधीच बजावण्यात आलं होतं, त्यामुळे तशी मनाची तयारी होतीच झालेली! पुण्यनगरीत उतरल्यावर, प्रवासाचा पुढचा टप्पा होता ‘पुणे मेट्रो’. ही एक…
अलीकडचीच गोष्ट. संध्याकाळी, गाडीत माझ्या समोरच एक बाई बसल्या होत्या. हल्ली पुरुषांचा प्रथम वर्गाचा डबा, अर्धा अधिक बायकांनीच व्यापलेला असतो. या बायका एकदा मुंबईला किंवा दादरला बसल्या की, थेट डोंबिवलीपर्यंत बूड हलवित नाहीत, हा नेहमीचाच अनुभव. परवा माझ्या नशिबाने मला बसायला जागा मिळाली आणि समोरची मध्यमवयीन महिला, नेहमीप्रमाणेच भ्रमणध्वनीत गुंतलेली आणि गुंगलेली. एकंदरीत, नक्कीच सरकारी कर्मचारी असावी, हा माझा तर्क. गाडी सुटली आणि बाईंचा दूरध्वनी वाजला. कोण होतं पलीकडे कोणास ठाऊक… पण तिच्याच कार्यालयातली कोणीतरी सहकारी असावी, असा माझा आपला कयास. तावातावाने बोलणं सुरू झालं… “हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ काय सांगतात ते ऐकलंच पाहिजे, एक स्त्री आहात म्हणून…
थायलंड, मलेशिया आणि मग शेवटचा टप्पा सिंगापूर. खूप छान चालली होती आमची सहल. आम्ही पंचवीस जण अगदी एकसंघ झालो होतो, पण घरून प्रस्थान करून आठवडाभर झाला होता आणि हॉटेलचं अन्न खाऊन विटलेल्या मनाला आता साध्यासुध्या ‘वरण-भाताची’ प्रचंड ओढ लागली होती. हॉटेलमधली न्याहारी ‘कॉन्टिनेंटल’ पद्धतीची असायची. अमाप आणि असंख्य पदार्थ, पण आपल्या पारंपरिक रसनेला मानवेल, असं काहीच नसायचं. काही वेळा इडली, पोहे किंवा उपमा असायचा, पण त्यांना म्हणावी तशी चवच नसायची. त्यामुळे हिरमोड व्हायचा, पण शेवटी तेच घशाखाली उतरवायला लागायचं… दुसरा काहीच पर्याय नसायचा. दुपारचं आणि रात्रीचं भोजन भारतीय हॉटेलमध्ये व्हायचं. हल्ली भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण हेच समीकरण सगळीकडे रूढ…
पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे एक वेगळीच दुनिया. तिथे समाजातल्या वरच्या थरातल्या, उच्चभ्रू लोकांचा वावर… चकचकाट आणि झगमगाट पैशांचा, सुबत्तेचा आणि आढ्यतेचा. तोऱ्यात मिरवणारे देशी, विदेशी पाहुणे, त्यांच्यासमोर मर्यादशील वागणारे आणि बोलणारे, पढवलेले कर्मचारी, असा सगळा माहौल. मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम केलेले बरेच जण आहेत माझ्या ओळखीचे. त्यांच्याशी बोलताना बऱ्याच सुरस कहाण्या ऐकायला मिळतात, याच थरातल्या लोकांच्या! आपण कधीही न ऐकलेल्या आणि कधीही न अनुभवलेल्या… तशीच एक कहाणी. मुंबईतलं एक प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल. कॉर्पोरेट इंडियाच्या आणि सरकारातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा, परदेशी पाहुण्यांचा सदैव राबता असलेलं… असाच एक मोठ्या हुद्दयाचा सरकारी अधिकारी महागड्या गाडीतून उतरून, उंची कपडे लेऊन, चेहेऱ्यावर उर्मट भाव वागवत हॉटेलमध्ये यायचा.…
पुण्याच्या विस्तारीत उपनगरातला, एक नव्यानेच उदयाला येत असणारा निवासी भाग. काही इमारतींमध्ये राहणारे रहिवासी, काही इमारतींचे काम सुरू… वगैरे नेहमीचंच दृश्य. माझा एक मित्र राहायला गेलाय तिथे नुकताच. या इमारतींपैकी एका इमारतीच्या तळमजल्याला मारवाडी समाजाच्या दुकानदाराची दोन दुकानं, नुकतीच सुरू झालेली… एक मिठाईचं आणि दुसरं जनरल स्टोर. माझा आत्तापर्यंचा अनुभव असा की, कुठल्याही नव्या विभागात पहिलं दुकान असतं ते मारवाड्याचं. तिथेही तेच दृश्य, परिचित! आगे दुकान, पीछे मकान या तत्वावर त्यांचा ठाम विश्वास. एक दुकान आधी सुरू होतं, मग त्याचा कोणीतरी नातेवाईक येतो आणि शेजारीच औषधांचं, हार्डवेअरचं, किराणा सामानाचं किंवा इतर तत्सम दुकान सुरू करतो. लोकं राहायला यायच्या आधी यांचे…
दुसरा शनिवार होता. माझा सुट्टीचा दिवस. नवऱ्याला तर सुट्टीच आणि लेक पण शनिवारी डबा न घेता जातो. मला थोडी विश्रांती आणि त्याला पण रोजच्या पोळीभाजीमधून सुटका, काहीतरी वेगळं चमचमीत खायला! उशिराच उठले थोडी. आमचा सगळ्यांचा चहा केला. चार माणसं आम्ही, त्यातही चार पंथ! आबांना बिनसाखरेचा अन् कमी दुधाचा. नवऱ्याला ग्रीन टी, मला आपला दुधाचा, गोड चहा आणि लेकाला कॉफी. हे सगळं करून, पोहे फोडणीस टाकून पेपर चाळत असतानाच आबा आले. सकाळी फिरायला जाऊन, मित्रांशी गप्पाटप्पा करून, पूजेसाठी फुलं खुडून, आबा निवांत परत यायचे. मग आंघोळ, न्याहारी, पूजा आटोपून निवांत पेपर वाचन असं साग्रसंगीत बेत. आज आल्यावर जरा वेगळेच वागत होते.…
नुकताच महिनाभर झाला होता तिचं लग्न होऊन. मजेत चालले होते दिवस. ती, तिचा नवरा, मोठा दीर, जाऊ, सासू, सासरे सगळे एकत्र राहायचे. घर तसं बऱ्यापैकी मोठं, पण एकत्र मोठ्या कुटुंबात राहायची सवय नसलेल्या तिला, ते वातावरण अंगवळणी पडायला अंमळ जड जात होतं, पण करत होती ती प्रयत्न, रमायचा आणि जमवून घ्यायचा! घरचे सगळे चांगले होते; पण अपत्य नसलेल्या, लग्न होऊन तीन वर्ष झालेल्या दिराची नजर काहीतरी वेगळीच होती. न्याहाळत असायचा तो तिला. ती पाठमोरी असली, तरी ती नजर रेंगाळतेय आपल्या पाठीवर, असा सदोदित भास व्हायचा तिला. विचित्रच वाटायचं काहीतरी… ती टाळायची त्या नजरेला नजर देणं, पण एक चमत्कारिक अशी काहीतरी…

