Author: अतुला प्रणव मेहेंदळे

Avatar photo

अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

“नाथा चल रे! गाडी काढ. माझी तयारी झालीय,” असं आक्कांनी म्हणताच नाथा धावला गाडी काढायला. तशी गाडी तयारच होती. फक्त सुरू करून दाराशी आणायची होती. आक्का म्हणजेच, श्रीमती मालिनी मधुकर अत्रे, पुण्यामधलं नावाजलेलं प्रस्थ. मधुकरराव असताना त्यांनी अत्र्यांचं पूर्वापार चालत आलेलं घराणं जपलं होतं आणि तद्नंतर घराण्याचं नाव वाढवलं पण होतं. त्याकाळी ‘बायकांना व्यवसाय काय जमणार!’ अशा स्वभावाचे लोक असूनही त्यांची तोंडं आक्कांनी बंद केली होती. मधुकररावांनी त्यांना अगदी अथपासून इतिपर्यंत व्यवसाय शिकवला होता. त्यात त्यांना साथ द्यायला गणपती बाप्पा होताच! अत्र्यांची बाप्पावर कोण श्रद्धा. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला अभिषेक ठरलेला. पहिले पहिले गरिबीच्या दिवसांमध्ये चालू केलेला 11 मोदकांचा…

Read More

“मनू, अगं किती चिडचिड करशील? जरा शांत हो. बघ तुझ्या अशा वागण्यामुळे बाळ पण उठलं. तूच तर झोपली होतीस एवढा वेळ… आणि आता बाळ उठलं तर, बाळावर कशाला चिडतेयस? अशी काय करतेयस आजकाल?” असं म्हणतच सोहम बाळाला उचलून बाहेरच्या खोलीत गेला. “उगी उगी, नको ग ललू माझी राणी. सोनं ग ते माझं. आईला केलं हं मी वा!” सोहम बाळाला जोजवत हॉलमध्ये घेऊन आला. तिकडे नंदाताई शेपूची भाजी निवडत बसल्या होत्या आणि त्याचे बाबा म्हणजेच राघवराव बारशाचं कसं करायचं, देणं-घेणं काय करायचं या सगळ्याची यादी बनवत होते. सोहमला असं बोलत आलेलं बघून नंदाताई म्हणाल्या, “कोण आहे ते आईला वा करतंय? आईला…

Read More

“वा अबिरा, आज एकदम सुंदर दिसतेयस. या सगळ्या पेहरावात तू म्हणजे एकदम माधुरी दीक्षितसारखी दिसतेस! साडी तुला छान कॅरी करता येते… आणि हे कानातले पण कित्ती छान मॅचिंग आहेत.” अबिराच्या ऑफिसमधल्या महिला सहकारी तिचं तोंडभरून कौतुक करत होत्या. अबिरा आज ऑफिसमध्ये जातानाच छान तयार होऊन गेली होती. आजचा दिवस तिच्यासाठी खास होता. आनंद आणि अबिराचं याचवर्षी दणक्यात लग्न झालं. ठाण्यातल्या शहनाईमध्ये वरचा आणि खालचा मजला घेतला होता लग्नाला… आणि त्यानंतरचे सगळे सणही छान साजरे केले तिने. लग्नानंतरची तिची ही नवरात्रमधली पहिलीच अष्टमी. मागच्या आठवड्यात तिने सासूबाईंना उत्साहात सकाळीच विचारलं, “आई, मी नवरात्रीत अष्टमीला देवीची ओटी भरू का? ही माझ्या आईकडची…

Read More

आपलं आटोपून दिलीप नाश्ता करायला बसला. समोरच दामिनी बसली होती. अगदी शून्यात नजर लावलेली, प्लेटमधला नाश्ता थंड झालेला, चमच्याने इतरत्र फक्त घोटाळत राहिली होती… तिला भानच नव्हतं कशाचं! तिची अवस्था दिलीपला खरंतर बघवत नव्हती. पण काळ हेच औषध आहे, हे दिलीपला कळत होत. तो दमिनीला सध्यातरी फक्त सोबत करू शकत होता. काहीही झालं तरी ‘मी आहे’ ही जाणीवच तिला मानसिक बळ देईल, याची त्याला खात्री होती. म्हणून तो नाश्ता करून दामिनीला समजावत म्हणाला, “दामिनी, अगं नको एवढा विचार करूस. आलेल्या प्रत्येकाला जायचंच असतं ग! मला माहिती आहे, हे सांगणं सोपं आहे. मलाही खूप वाईट वाटतंय गं… तू सावर स्वतःला… मी…

Read More

“मीना, अगं तू अशी काय बसलीस? अगदी काहीही न झाल्यासारखी! मी इथे इतका अस्वस्थ आहे आणि तू चक्क गाणी ऐकतेयस. तेही ‘पिया तू अब तो आजा…’ अशी! मला वाटलं नव्हतं, तू इतकी बेपर्वा वागशील…” असं म्हणतच पायात चप्पल सरकवून जयंतराव टिळक वाचनालयाचं पुस्तक बदलायच्या निमित्ताने बाहेर पडले. त्यांनी मीनाला बोलायची संधीच दिली नाही आणि मीनाला याचं काहीच वाटलं नाही. मीना जयंत टिळक, एका सुखवस्तू घरातली गृहिणी. लग्नाला आता जवळपास 35 वर्षं झाली. जयंतराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालेले. त्यांना एक मुलगा सोहन आणि मुलगी अमृता! जिचं लग्न होऊन सासरी आनंदात रहात आहे. सोहनची बायको निहिरा. ती सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि मोठ्या कंपनीत…

Read More

आज नमिताचं कशात लक्षच लागत नव्हतं. शिवाय, हातही अगदी यंत्रवत चालत होते. करणार काय? तीन-चार दिवसांपासून तिला सर्दी, खोकला होता आणि दुपारी तर चक्क थोडा तापही आला म्हटल्यावर नमिताबाई एकदम घाबरल्या की! सार्थक, तिचा नवरा, वर्क फ्रॉम होममुळे घरातच होता. त्याने पण दोन-तीन दिवसांचं सगळं तालमाल बघून तिला सांगितलं, “नमू, मला काय वाटतं आपण एकदा टेस्ट करूनच घेऊयात. निगेटिव्ह आली तर चांगलंच आहे, पण पॉझिटिव्ह आली तर, वेळेवारी औषधं चालू होतील नं. काय वाटतंय तुला?” नमिता विचार न करता लगेचच म्हणाली, “मी पण हेच म्हणणार होते. उगीच रिस्क कशाला? आपल्याकडे रोहन पण आहे 10 वर्षांचा आणि काय असेल ते होऊन…

Read More

सुहासिनीबाई आज अगदी आनंदात होत्या. त्यांच्या लेकीचा मनस्वीचा आज ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून शासनातर्फे सन्मान होणार होता. “हे बघायला आज हे हवे होते. ह्यांना खूप आनंद झाला असता, आपल्या लेकीला पुरस्कार मिळतोय बघून… दरवेळी आपल्याला हवं तसं थोडीच घडतं. पण कधीकधी आपल्या मनासारखं नाही घडत तेच योग्य असतं आणि भल्याचं असतं असंच आजच्या दिवसावरून म्हटलं पाहिजे. नाहीतर मनस्वीचा हा सन्मान अशक्यच होता.” असा विचार सुहासिनीबाईंचा सुरू होता. त्या झोपाळ्यावर बसून चहा घेत होत्या. तेवढ्यात मनस्वी आलीच… “अग आई, मी निघते पुढे. शाळेत एक-दोन कामं आहेत. ती झाली की, आपण सगळेच ह्यांच्याबरोबर निघूयात? नाहीतर मानसच्या गाडीतून जाऊयात. आज त्याने सुट्टीच टाकली आहे…

Read More

“श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.” श्रावणीची आई वसुधाताई हाका मारून दमल्या होत्या… आणि खरं सांगायचं तर, त्या कंटाळल्याही होत्या. श्रावणीच्या लग्नासाठी खूपच जोडे झिजवावे लागत होते त्यांना. श्रावणी जगताप आता जवळजवळ 32 वर्षांची झाली आहे. तिला प्रेमविवाह करायचा नाहीये आणि ठरवून केलेल्या लग्नासाठी पण तिच्या दोनच अटी आहेत. मुलगा तिच्या स्वभावाला साजेसा असावा आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तिच्या आईला सांभाळणारा असावा. या अटीमुळे तिचं लग्न काही जुळता जुळत नाहीये. यावेळी मात्र वसुधाताईंनी दोन दिवस आधी तिला जवळ बसवून सांगितलं, “अगं श्रानू अशी अट घालशील तर, कायमच माझ्यासोबत रहायला लागेल बिनालग्नाचं! अगं, लोकं मला…

Read More

“अरे ओंकार, काहीच होऊ शकत नाही का रे आपल्या जाण्याबद्दल? आपण परत विचार करूयात नं? इथे पण तुला पुढे चांगल्या संधी चालून येतीलच की… आणि आता आठवीला श्रेयसची शाळा बदलायची म्हणजे खूप त्रास होईल आपल्याला. नाहीतर आपण असं करूयात का? असेही तुझं तिकडे स्थिरस्थावर होईपर्यंत थोडे दिवस आम्ही आहोतच इथे… नंतर पण आम्ही दोघे इथेच रहातो बाबांसोबत. त्याची शाळा संपली तीन वर्षांनी की, मग बघू तिकडे यायचं.” अपर्णा ओंकारला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती आणि त्यासाठी कधीही तोंड वर करून न बोलणारी ती, एकदम एका दमात सगळं बोलून गेली. तसा तिच्या बोलण्याचा त्याच्यावर ढीम्म फरक पडणार नव्हता, हे तिलाही माहीत…

Read More

“अनया, अगं आज आपल्याला जायचं आहे ना अप्पूकडे. तू थांब जरा मी येते तुझ्याकडे आणि मग तुला तयार करून मी पण तयार होते. मग जाऊ आपण. तुला एवढं पोट घेऊन कुठे सगळं आवरता येणार आहे. त्यात पीयूष पण उद्या घरी नाही. दिल्लीला गेला आहे ना आज सकाळीच… आणि तुझी आई पण इथे नाहीये. मी बरोब्बर 3 वाजता येते, मग आपण जाऊ,” मैथिली असं बोलून फोन ठेवते. मैथिली म्हणत होती ते काही तितकंसं खोटं नव्हतं. आताशा अनयाची हालचाल थोडीफार मंदावली होती. तिला सातवा महिना लागला होता. पोटाचा घेर चांगलाच वाढला होता. आतून बाळ भरपूर लाथापाणी खेळत होतं. खरंतर, अनया गेल्या काही…

Read More