Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: विशाल कुलकर्णी
विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.
काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिल्लीत तीन-चार दिवस मुक्कामाचा योग होता. दरवर्षी दिल्लीत हॉटेल ग्रॅंड अशोकमध्ये ही छोटीशी कॉन्फरन्स भरते. आमच्या कंपनीचा (ट्रिंबल) बुथ असतो. त्यावेळी आमच्या ओम्निस्टार सर्व्हिसेससंदर्भात मलाही एक छोटेसे प्रेझेंटेशन करायचे होते. कंपनीने राहायची सोय अशोकमध्येच केली होती. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन स्थळीच होतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी सगळ्या निमंत्रितांसाठी म्हणून अशोकमध्येच एक स्वागत भोजनाचा बेत होता. पण दिवसभर स्टॉलवर उभे राहून कंटाळलेलो असल्याने मी त्या स्वागत भोजनाच्या कार्यक्रमाला जायचे नाही, असे ठरवले होते. फारशी भूकही नव्हती, त्यामुळे रूमवरच उपलब्ध असलेली फळे खाऊन वसंतरावांना ऐकत शांत पहुडलो होतो. तेवढ्यात कुठून तरी कानावर बागेश्रीचे…
‘परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…’ हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी 1927 साली लिहिलेल्या ‘रणदुंदुभि’ या नाटकातील हे गीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे. वीर वामनराव जोशींच्या शब्दांना पंडित वझेबुवांच्या संगीताने आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने जे काही दिव्य रूप दिले, त्यामुळे हे गीत नाटकांच्या इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेले आहे. त्यांच्या या गीताचा गाभा…
ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर, खरोखर आधी संसार सोडावा लागतो का? की संसार समजून घ्यावा लागतो? हा प्रश्न भारतीय किंवा खरेतर जगातील प्रत्येक समाजाला शतकानुशतके पडत आला आहे. ‘चित्रलेखा’ चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते हो…’ हे गीत याच प्रश्नाला अत्यंत साध्या, पण अस्वस्थ करणाऱ्या शब्दांत आपल्यासमोर ठेवते. म्हणूनच हे गीत केवळ चित्रपटाचा भाग राहत नाही; ते जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी बनते. पहिल्यांदा ऐकताना हे गाणे एखाद्या संन्याशाला उद्देशून गायलेले वाटते, पाहताना तर त्यावर शिक्कामोर्तबही होते. पण पुन्हा पुन्हा ऐकले की लक्षात येते, हा प्रश्न केवळ ‘कुमारगिरीं’ना (अशोक कुमार) विचारलेला नाही. तो आपल्या प्रत्येकाला विचारलेला आहे. आपण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या…
बंगाली चित्रपटसृष्टी ही एक निराळेच जग आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन, श्रीजीत मुखर्जी, बुद्धदेव दासगुप्त यासारख्या मनस्वी दिग्दर्शकांनी भारतीय सिनेसृष्टीला अगदी भरभरून दिलेले आहे. या यादीत अजून एक नाव जोडायचे आहे मला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा एकच चित्रपट आला, तोही बंगाली भाषेत. पण एक कला दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडबरोबरच तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतरही भाषांमधून त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. ते म्हणजे श्रीयुत समीर चंदा! त्यांनी बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांचे सेट डिझाइन केलेले आहेत, ज्यासाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. रंग दे बसंती (2006), ओमकारा (2006), गुरू (2007), दिल…
एका विकांताला (बऱ्याच काळानंतर) उंडगायला बाहेर पडलो होतो, सहकुटुंब! ‘पाऊस’ असा छान बरसत होता की, जणू काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरुवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा.. पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणूकाही मेघांचा निरोप घेऊन पृथ्वीकडे झेपावणार्या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोहोचले रे पोहोचले, की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेऊन सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते. वेस लांघूनी क्षितीजाची घन सावळे बरस बरसले प्रिया बावरी धरा नटावी नभांत ओले रंग…
अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू…’ ऐकलं, तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून ‘माई रीSS, मैं कासे कहूं…’ ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदन मोहन यांची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते. तेव्हा मात्र, “अरे, लष्करमध्ये नको, तिकडे नव्या पेठेत तो अमुक कॅसेटवाला आहे ना, तो तुला अगदी…
भारतीय समांतर चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा काही चित्रपट केवळ कलाकृती म्हणून नव्हे, तर काळाने दिलेल्या जखमांवर ठेवलेले संवेदनशील हात म्हणून स्मरणात राहतील. बुद्धदेव दासगुप्ता यांचा ‘तहादेर कथा’ हा असाच एक चित्रपट आहे. 1992 साली प्रदर्शित झालेला हा बंगाली चित्रपट केवळ एका अज्ञात स्वातंत्र्यसैनिकाची कथा न सांगता; तो एका पिढीच्या भंगलेल्या स्वप्नांचा, अपेक्षाभंगाचा, विस्मृतीत गेलेल्या त्यागाचा आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या अंतर्मनात दडलेल्या वेदनेचा जिवंत दस्तऐवज बनून जातो. कमलकुमार मजुमदार यांच्या साहित्यकृतीवर आधारित असलेला हा चित्रपट पाहताना असे वाटत राहते की, आपण एखादी कथा, एखादा चित्रपट पाहात नसून, इतिहासाच्या विस्मरणात गेलेल्या पानांमधून उठणारा एक दीर्घ, उदास नि:श्वास ऐकत आहोत. चित्रपटाचा नायक शिबनाथ…
काही गाणी आपण ऐकतो. काही गाणी आपल्याला गुणगुणावीशी वाटतात. पण काही निवडक गाणी अशी असतात की ती ऐकताना नकळत डोळे मिटतात, श्वास संथ होतो आणि मन एका वेगळ्याच शांत प्रदेशात पोहोचते. “मन आनंद आनंद छायो…” हे असेच एक गीत आहे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटातील हे गाणे. गोविंद निहलानी दिग्दर्शित आणि शशी कपूर निर्मित हा चित्रपट एका तरुणाच्या आत्मशोधाची कथा सांगतो. जीवनातील गोंधळ, अपयश, आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यानंतर स्वतःचा शोध घेत पुन्हा उभे राहण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासातील अंतर्मनाचा उजेड म्हणजे हे गीत. या गीताचे शब्द लिहिले आहेत कवी वसंत देव यांनी. त्यांच्या लेखणीत साहित्य, अध्यात्म आणि…
उत्तरार्ध जुम्मन चाचा, अब्दुल आणि जगदाळे मास्तर हे तिघेही असेच एकटेपणाचा शाप घेऊन जगत असलेले समदुःखी. आपल्या रोजच्या नित्यक्रमाने बांधलेले. जगण्यासाठी आयुष्याशी झगडत रहाणे, हाच एकमेव नित्यक्रम होता त्यांचा. पण आजचा दिवस काही वेगळेच प्राक्तन घेऊन आला होता. दुपारच्या जेवणापर्यंत सगळे नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक एक घोळका वेशीकडे जाताना दिसला. थोड्या वेळाने अजून काही लोक पळत वेशीकडे जाताना दिसले. असेल काही तरी म्हणत चाचाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण गर्दी वाढ़ायला लागली तसे चाचाने एकाला हटकले, “क्या हुआ रे मारती? येवडी गर्दी कशापाय जमली रे?” “पानी आ रा चिच्या. वडे (ओढे) में पानी आ रा भोत. वरल्या धरणाचं…
पूर्वार्ध जुम्मन चाचाच्या ‘फायुस्टार हाटेला’तल्या तडे गेलेल्या भिंतीवरच्या एकुलत्या एक जुनाट लाकड़ी फळीवरच्या जीर्ण झालेल्या, धूळकट काचेच्या बरणीत ठेवलेले तेलकट चुरमुऱ्याचे लाडू काढताना ती जुनाट फळी एखाद्या शंभरी उलटलेल्या म्हातारीसारखी कुरकुरली. “क्या चिच्चा, अबी कित्ता परेशान करींगे ये बुढ्ढी फल्ली को? पंदरा रुपय में दूसरी बिठा को देता बोल्या मई तो सुनतेच नै तुमें? कित्ता चिंगुसपना करींगे होर?” दुकानासमोर, एक बाजू लिंबाच्या झाडाच्या खोडाला बांधलेल्या बाकड्यावर टेकता टेकता अब्दुल मनापासून हसला… “क्या करींगे रे फल्ली बदल को? मेरी बेगमकू थोडीच बिठाना उसपे? छोड़ उनो, चा पियेगा क्या?” जुम्मनचाचा स्वतःच्याच विनोदावर हासत स्टोव्हचा पंप मारायला लागले. “अपनी म्हतारी को बिठाव तो.…

