Author: प्रणाली मंगेश महाशब्दे

प्रणाली महाशब्दे

संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

माहेर म्हणजे नेमकं काय असतं? चार भिंतींचं घर? आईच्या हातचं जेवण? बाबांची माया? भावाची साथ? की वहिनीच्या मनात जपलेली आपुलकी? की या सगळ्यांच्या पलीकडे असलेली एक अशी जागा, जिथे मुलगी कितीही मोठी झाली, कितीही वर्षांची झाली, तरी तिचं मन मात्र लहानपणीच रेंगाळत राहतं! माहेर म्हणजे असं एक हक्काचं ठिकाण, जिथे लेकीला आजही वाटतं… ‘मी आले गं आई!’ गावात एक जुनं, कौलारू घर होतं. त्या घरात सत्तरी पार केलेले आई-बाबा राहत होते. वयामुळे दोघांच्याही शरीराची ताकद कमी झाली होती. चालताना पावलं जपून टाकावी लागत होती, डोळ्यांना चष्म्याची मदत लागायची आणि एखादी गोष्ट आठवायला कधी कधी वेळ लागायचा. पण एक गोष्ट मात्र…

Read More

दसरा आला की, घराघरांत आनंदाचं वातावरण निर्माण होतं. घराची साफसफाई होते, दारात सुंदर रांगोळी सजते, झेंडूच्या फुलांचे तोरण लागते. पुस्तकांची, वही-पेनांची, वाहनांची आणि शस्त्रांची पूजा केली जाते. सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानाचा आशीर्वाद मागितला जातो. संध्याकाळी मैदानावर रावणदहन होतं आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू होते… पण या सगळ्या उत्साहात एक प्रश्न मनाला अस्वस्थ करून जातो… आपण दरवर्षी रावणाचं दहन करतो, पण आपल्या मनातल्या रावणाचं काय? ही गोष्ट आहे एका छोट्याशा घराची. एका वडिलांची… एका मुलाची… आणि आपल्या सगळ्यांच्या मनात दडलेल्या रावणाची! एका छोट्याशा गावात गणेशराव नावाचे एक शिक्षक राहत होते. परिस्थिती बेताची होती, पण विचारांची श्रीमंती अफाट होती. आयुष्यभर…

Read More

नवरात्रीच्या घटस्थापनेत सप्तधान्य पेरण्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच शेती आणि निसर्गाशी जोडलेला सुंदर अर्थ आहे. सप्तधान्य म्हणजे साधारणपणे सात प्रकारची धान्ये/ बीजे. मात्र कोणती सात धान्ये घ्यायची याची पद्धत प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. सप्तधान्य का पेरतात? समृद्धीचे प्रतीक सात धान्यांची हिरवीगार पालवी उगवणे हे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, याचे प्रतीक मानले जाते. अन्नधान्याबद्दल कृतज्ञता धान्य म्हणजे जीवनाचा आधार. घटात बी पेरून आपण अन्न निर्माण करणाऱ्या निसर्गाचे आणि शेतकऱ्याचे स्मरण करतो. सृष्टीच्या चक्राचे प्रतीक बी → अंकुर → रोप → पीक → पुन्हा बी, हे निसर्गाचे जीवनचक्र आहे. नवरात्रीतील अंकुरण त्या नवीन सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीच्या शक्तीशी संबंध…

Read More

एका गावात तीन मित्र राहत होते — सुमित, राजू आणि तानाजी. तिघेही हुशार होते; पण त्यांचा स्वभाव वेगळा होता. सुमित — शांत आणि विचारशील… सुमित सकाळी लवकर उठायचा. तो आपले काम नियोजनाने करायचा. अडचण आली तर घाबरायचा नाही. तो म्हणायचा, “पहिले परिस्थिती समजून घेऊया, मग निर्णय घेऊ.” तो इतरांना मदत करायचा आणि मिळालेल्या यशाचा गर्व करायचा नाही. त्याच्यामध्ये सत्वगुण अधिक होता. राजू — सतत धावणारा… राजू खूप मेहनती होता. त्याला मोठे घर हवे होते. जास्त पैसा कमवायचा होता. गावात सर्वांनी त्याचे कौतुक करावे, अशी त्याची इच्छा होती. तो दिवसभर काम करायचा. त्याने बरेच यश मिळवले. पण त्याला शांत बसता येत…

Read More

एकदा एका छोट्या गावात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली. प्रत्येकाच्या घरात उत्साह होता. कुणी मखर सजवत होते, कुणी फुलांची आरास करत होते, तर कुणी बाप्पांसाठी नैवेद्याची तयारी करत होते… गणपतीची मूर्ती घरी आली आणि मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा झाली. त्या क्षणी घरातील वातावरण बदलून गेले. मूर्ती मातीची होती, पण भक्तीने तिच्यात देवत्व अनुभवले जाऊ लागले. सकाळ-संध्याकाळ आरती होऊ लागली. घरातील प्रत्येकजण बाप्पांशी मन मोकळे करून बोलू लागला. कोणी म्हणत होतं, “बाप्पा, माझं काम होऊ दे…” कोणी म्हणत होतं, “बाप्पा, घरात सुख-शांती ठेव…” आणि एक लहान मुलगा मात्र रोज बाप्पांसमोर बसून एकच प्रश्न विचारायचा — “बाप्पा, तुम्ही आमच्याकडे किती दिवस राहणार?” आई हसायची…

Read More

“आई, यंदा गौरी थोड्या साध्या पद्धतीने करूया का?” मधुराचा प्रश्न ऐकून आजीने हातातले तांदूळ खाली ठेवले. “का गं?” “वेळ कमी आहे. नोकरी, घर, मुलांचं सगळं… आणि एवढा मोठा थाट करण्याची गरज तरी काय?” आजी काही बोलली नाही. फक्त हसून म्हणाली, “गौरी साध्या केल्या तरी चालतील गं… पण घरातली माणसं मनाने दूर जाऊ नयेत.” बाजूला उभी असलेली सई हे ऐकत होती. सईला या सगळ्या परंपरांचा फारसा अर्थ वाटत नव्हता. तिने आईला विचारलं,  “आई, खरंच सांग… गौरी आल्या म्हणून काय बदलतं? दोन दिवस पूजा, नैवेद्य, पाहुणे आणि मग सगळं पूर्वीसारखंच!” मधुरा काही बोलणार, तेवढ्यात आजी म्हणाली, “बदलतो तो मनाचा कोपरा.” सई हसली……

Read More

आई मुलांसाठी फक्त त्याग करत नाही; ती मुलांच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठं मानते. पिठोरी अमावस्येला माता आपल्या लेकरांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक आईच्या मनात एक स्वप्न असते… “माझं लेकरू मोठं होऊ दे, पण त्याचबरोबर चांगलं माणूसही होऊ दे.” म्हणून मुलांनीही आईच्या कष्टांची जाणीव ठेवावी. आईला मोठी भेट देण्याची गरज नाही. कधी तिच्या हातात हात घ्या. कधी तिच्यासोबत बसा. कधी तिच्या कष्टांसाठी “धन्यवाद आई” म्हणा. कारण — “आईने आपल्या आयुष्यासाठी जे दिलं आहे, त्याची परतफेड पैशांनी नाही; तर आपल्या चांगल्या कृतींनी करता येते.” आणि म्हणूनच — “आईची स्वप्नं पूर्ण करणं, हीच मुलाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुरुदक्षिणा आहे. हे सांगणारी ही गोष्ट……

Read More

एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप कष्टाळू होता; पण आयुष्यात सतत अडचणी येत असल्यामुळे तो निराश झाला होता. व्यवसायात नुकसान, मित्रांशी गैरसमज आणि घरातील जबाबदाऱ्या… यामुळे त्याला वाटू लागले की, “देव माझ्या आयुष्यात आहे तरी कुठे?” एके दिवशी तो गावाबाहेरील मंदिरात गेला. मंदिरात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती होती. माधव कृष्णासमोर बसला आणि म्हणाला, “कृष्णा, मी तुझी पूजा करतो, तुझे नाव घेतो; पण माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आहेत? तू माझ्यासोबत असशील, तर माझे दुःख का दूर होत नाही?” तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्यांनी माधवचे बोलणे ऐकले आणि शांतपणे म्हणाले, “बाळा, तुला श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात का…

Read More

एका गावात दोन भाऊ राहत होते — अमोल आणि अनिल. दोघेही लहानपणापासून खूप प्रेमाने वाढले होते. आई-वडिलांनी त्यांना नेहमी एकच शिकवण दिली होती — “पैसा कितीही कमवा, पण माणसं गमावू नका. आपण किती पैसा कमावला हे नाही, तर आपण किती माणसं मनापासून जोडली, हे महत्त्वाचं असतं.” काळ पुढे गेला. दोघांची लग्नं झाली. अमोल शहरात नोकरीला गेला, तर अनिल गावातच राहिला. सुरुवातीला दोघांचा रोज फोन व्हायचा… “काय रे, जेवलास?” “हो. तू जेवलास का?” “आईची औषधं आणलीस?” “हो, काळजी करू नकोस.” अशा छोट्या-छोट्या संवादातून त्यांचं नातं घट्ट होतं. पण हळूहळू अमोलच्या नोकरीचा व्याप वाढला. मीटिंग, काम, प्रवास… फोन कमी झाले. अनिललाही वाटू…

Read More

I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे एकत्र बसलो असताना सोनूने म्हणजे माझ्या लेकीने एक व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये एका किटी पार्टीमध्ये काही गेम्स चालू होते. छान मजेत सगळ्याजणी होत्या. थोड्या वेळाने एक नवीन खेळ खेळायचा ठरला. खेळ होता “आपल्या नवऱ्याला फोन करून ‘I Love You’ म्हणायचे आणि त्याचा काय प्रतिसाद येतो ते बघणे…” तसं पाहिलं गेलं तर, या सगळ्याजणी सामान्य घरातल्या. त्यामुळे सगळ्याजणीच थोड्या भांबावल्या… कारण हे असं सगळ्यांसमोर म्हणणं आणि त्यावर नवऱ्याची प्रतिक्रिया पण बघणं… सगळंच कसं विचित्र. मग काय एकेकीने नवऱ्याला फोन केला. पण हे नवऱ्याला सुद्धा अनपेक्षितच होते, ते…

Read More