Author: हर्षा गुप्ते

Avatar photo

मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. कोजागरी पौर्णिमा झाली. आता तिचं अप्रूप राहिलं नाही. कारण माझ्या लहानपणासारखी कोजागरी पौर्णिमा आता कोणी साजरी करत नाहीत. कसली धम्माल करायचो आम्ही! आई, मोठी आई म्हणजे माझी आजी. दिवसभर घरात खपून कितीतरी पदार्थ बनवायच्या. बटाटे वडे, कांदा भजी, कांदे पोहे, गोडाचा शिरा… नंतर आईने एक पदार्थ अजून बनवायला सुरुवात केली. भरलं पापलेट! हे सगळे पदार्थ डब्यांमध्ये नीट भरायचे. एका मोठ्या काचेच्या बरणीत प्यायचं पाणी भरायचं. वर्तमानपत्र, चादरी, ताटल्या, चमचे, ग्लासेस असे सगळं सामान पिशव्यांमध्ये भरायचं आणि संध्याकाळची वाट बघायची… म्हणजे आप्पांची ऑफिसमधून घरी येण्याची. आम्ही तयारीतच असायचो. आप्पा आले की, थोडे…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आजचा विषय माझी आठवण किंवा अनुभव नाही… तर, माझी आवड अन् प्रेम आहे. ‘तारिणी’ म्हटलं की, एकच अर्थ तारणारी, ती तारिणी! जगत तारिणी… देवी आई. माझ्या आईचं नाव तारिणी. तिला ते आधी मुळीच आवडायचं नाही. म्हणायची की, ‘असलं कसलं नाव ठेवलं माझं. कधीच कुणाचं असं नाव ऐकलं नाही!’ मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा आईचं हे माहेरचं नाव मला खूप आवडायला लागलं. …आणि एकेदिवशी मला मोबाइल कॉल आला की, ‘तारिणी’ नावाची टीव्ही सीरियल करतोय. त्यात नायिका ‘तारिणी’च्या आजीचा रोल आहे. इंटरेस्टेड असाल तर ऑडिशनला या… शूट ठाण्याला असेल. मी ‘ओके’ म्हटलं आणि…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. काय दिवस आलेत, चार दिवस झाले नाना काकांना जाऊन आणि सोमवारी (12 ऑक्टोबर 2026) बातमी आली की, मधूताई गेल्या! मधूताई म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर. पूर्ण सिनेमाच जणू डोळ्यांसमोर येत गेला… किती त्या आठवणी, स्मृती… त्यांच्या जाण्याचं दुःख आहेच, पण दीर्घ आजारातून त्या सुटल्या म्हणून निःश्वास सोडावा?? एका मराठी सीरियलचं शूटिंग होतं, मढमध्ये शक्ती कपूरच्या बंगल्यात. दुपारचा कॉलटाइम होता. मी पोहोचले तिथे तेव्हा एक सीन सुरू होता. बंगल्यामधली एक बेडरूम आम्हाला मेकअप रूम म्हणून दिली होती. मी तिथे जाऊन बसले. लंच-ब्रेक झाला, सगळे जण आले. साधी साडी, डोक्यावर पदर अशी संपूर्ण…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गणपती बाप्पा गावाला गेले. आता पुढचा प्रवास. महालय सुरू. म्हणजे पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष. कोणीही काहीही म्हणो… पण हे असे दिवस आहेत की, या दिवसांत आपली पितरं आपल्या घरी जेवायला येतात, असं आपण मानतो. छान सुग्रास स्वयंपाक बनवला जातो आणि त्या अन्नाचा नैवेद्य करून आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या नावाने ‘काव घास’ ठेवला जातो. आपली श्रद्धा की, आपले देवाघरी गेलेले आप्त, कुटुंबीय आज आपल्या घरी जेवायला आले. त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळो, अशी प्रार्थना करतो. माझ्या लहानपणापासून मी हे श्राद्ध बघत आलेय. माझ्या आजोबांचं दादाजींचं श्राद्ध. इथे एक नियम आहे की,…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. वाजत गाजत बाप्पा आले… दीड दिवसांचे माघारी गेले… गौराई आल्या… पाच दिवसांचे बाप्पा गावाला गेले… यंदा गौरी-गणपती सहा दिवस होते. सहाव्या दिवशी बाप्पा आपल्या आईसोबत कैलासावर निघून गेले. सातव्या दिवसाचे पण गेले… आणि अनंत चतुर्दशीला ‘पुढल्या वर्षी लवकर’ येण्याचं आश्वासन देऊन बाप्पा त्यांच्या घरी गेले सुद्धा. बाप्पाचे मखर, संपूर्ण घर कसं ओकंबोकं झालं! लहानपणीचा एक प्रघात होता. आमच्या घरचे बाप्पा गेले की, दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर कपडे बदलून चहा पिऊन पटापट अभ्यास उरकायचा. जेवून तयार व्हायचं आणि सार्वजनिक गणपती बघायला निघायचं. सगळ्या खेतवाड्यांचे, कुंभार वाड्याचा, कॉटन ग्रीन, भायखळा, लालबागचे सार्वजनिक गणपती…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गणपती तोंडावर आले की, माझ्या विहीणबाई ज्योती ताई गेली पाच वर्षे माझ्या मागे लागल्या होत्या की, “लक्ष्मीच्या आई चला ना माझ्याबरोबर किंग्ज सर्कलला. जीएसबीच्या गणपतीचं विराट दर्शन घ्यायला.” मी आपली नेहमी ‘हो, हो’ म्हणायचे. पण कधीच जमलं नव्हतं. यावर्षी ठरवलंच की, “जायचं म्हणजे जायचंच…” आणि जमलं की हो! यावर्षी मी मंगला ताईंच्या कृपेने ज्योती ताई आणि मिलिंद दादासोबत विराट दर्शनला पोहोचले. तिथलं सगळं प्रकरणच विराट होतं. आतमध्ये फार सहज प्रवेश झाला. बसायला खुर्च्या पण राखून ठेवल्या होत्या. आम्ही आतमध्ये गेलो, फ्रेश झालो. मस्त आलं-वेलची घातलेला गरमागरम दुधाळ चहा पिऊन जागेवर येऊन…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. सध्या वातावरण खूप मस्त आहे. श्रावण सुरू होतानाच वेध लागतात सणांचे. हा श्रावण सरलाय, आता मात्र आतुरता बाप्पाच्या आगमनाची! बाजारात अगदी धांदल उडालीय, तऱ्हेतऱ्हेच्या सजावटी, मखर, खरी-खोटी फुलं-पान, वेली. रस्त्याच्या कडेला उभारलेले मांडव ज्यात विक्रीसाठी ठेवलेल्या बाप्पांच्या सुंदर सुबक मूर्ती. त्या पाहताना लहानपण आठवलं. आजोबा, वडील, काका, आत्या आणि आम्ही भावंड बाप्पाला घरी आणायला जायचो. छान टाळ, घंट्या, टाळ्यांच्या आणि ‘बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पा घरी यायचे. तेव्हा आतासारखं डीजेच्या गोंधळात बाप्पा येत नव्हते. टाळ वाजवत, फार तर फार ताशा, कोंबडी बाजा, मग कच्ची आणि बेंजो या वाद्यांवर सार्वजनिक गणपतींचं आगमन व्हायचं.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… आज भेटुयात आपल्या मुंबईला! मुंबई मेरी जान… मी मुंबईकर… खरंतर, मुंबई खरंच महान आहे. अठरा पगड जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकत्र जगवते, ती माझी मुंबई. अडल्या-पडल्याला मदत करते, स्वतःमध्ये सामावून घेते… ती आमची मुंबई. अव्याहत धावत असते, माणसांनी ओतप्रोत भरलेली, कधीही न थांबणारी, न थकणारी माझी मुंबई. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्म भूमी! बाहेरगावाहून कोणीही यावं… शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी… मुंबई त्यांना आपलंसं करतेच. हाताला काम, भुकेल्याला दाणा देते, डोक्यावर छप्पर सुद्धा देते. अशी ही माझी मुंबई. अगदी घातपातानंतर सुद्धा ताठ उभी राहते. एकदा एक हिंदी सीरियलच्या सेटवर एक मुलगा म्हणाला की, “आपकी…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मी अकरावीला असताना ‘हीरो’ सिनेमा रीलीज झाला. खूप सारे नावाजलेले कलाकार त्यात होते. शिवाय, दोन नवीन कलाकार – जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री. ब्लॉक बस्टर फिल्म ठरली. जॅकी आणि मीनाक्षीच्या प्रेमात पडलेली तरूणाई. जॅकीसाठी मुली तशाही वेड्याच झाल्या होत्या. मी म्हणायचे, ‘त्यात काय एवढं फक्त हँडसम आहे. ॲक्टर तर यथातथाच…’ पण ‘परिंदा’ रीलीज झाला आणि जॅकीने सिद्ध केलं की, तो ॲक्टर पण चांगलाच आहे! त्याच्या इतर भूमिका बघता बघता मलाही तो आवडायला लागला. मधे खूप वर्षे गेली. विक्रोळीला दहीहंडीच्या कार्यक्रमाला मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे हा बाबा भेटला. लांबूनच…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. हनी ट्रॅप (Honey trap)… जरा वेगळा आणि चर्चेसाठी तसा धाडसी विषय. काही बोल्ड किंवा कडक शब्द वापरले गेले, तर आज मला माफ करा. मी एक मराठी सीरियल करत होते. पाच-सहा तरुण मुली होत्या, त्या सीरियलमध्ये. तिथे जो सगळ्यात मोठा जबाबदार माणूस होता, खूप उत्कृष्ट काम करणारा ‘एक्स’ म्हणूयात त्याला. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे सगळ्या मुली सेटवर आल्या की, ‘दादा’ म्हणून त्याला मिठी मारायच्या. तोही तेवढ्याच प्रेमाने त्या मुलींना ‘Good morning’ म्हणायचा. नवीनच लग्न झालं होतं त्याचं. नेमकं काही काळासाठी आमचं नाइट शूट लावावं लागत होतं. प्रत्येक जण आपापल्या कामात असायचे. हा ‘एक्स’ त्याचं…

Read More