Author: डॉ. शैलेंद्र वैशंपायन

Avatar photo

डॉ. (प्रा.) शैलेंद्र आर. वैशंपायन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डॉ. व्ही.’ या नावाने परिचित आहेत. त्यांना 26 वर्षांचा चिकित्सकीय आणि 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते होमिओपॅथीवरील चार पुस्तकांचे आणि चार शोधनिबंधांचे लेखक असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित होमिओपॅथिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली असून ‘Dr V’s World of Homoeopathy’ हा त्यांचा पॉडकास्टही आहे. थायरॉईड विकार, चिकित्सकीय संशोधन आणि हॅनिमॅनियन होमिओपॅथी ही त्यांच्या विशेष अभ्यासाची क्षेत्रे आहेत.

भाषांतर करता करता हॅनिमन एका ठिकाणी थबकला… विल्यम कलेन यांनी ‘सिंकोना’ किंवा ‘पेरुव्हियन बार्क’ हे Intermittent fever — त्या काळी ज्याला ‘मलेरियासदृश ताप’ म्हटले जाई — यावर प्रभावी ठरते, असे लिहिले होते. ‘सिंकोना’च्या या परिणामाचे स्पष्टीकरण देताना कलेन यांनी तिच्या कडू आणि तुरट गुणांमुळे निर्माण होणाऱ्या tonic परिणामाला, विशेषतः पोटावर होणाऱ्या शक्तिवर्धक परिणामाला, महत्त्व दिले होते. आजच्या pathology किंवा pharmacologyच्या ज्ञानातून पाहिले, तर अर्थातच या स्पष्टीकरणाला फारसा अर्थ उरत नाही. पण आपण अठराव्या शतकाच्या अखेरीबद्दल बोलत आहोत. त्या काळातील उपलब्ध वैद्यकीय ज्ञानाच्या चौकटीतून कलेन यांनी हे स्पष्टीकरण दिले होते. पण हॅनिमनला ते पटले नाही. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला —…

Read More

तत्कालीन ॲलोपॅथी उपचारपद्धतींचा, होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल  हॅनिमनच्या मनावर खोलवर परिणाम झाला असावा. औषधाची योग्य मात्रा किती, त्याची उपचार करण्याची क्षमता किती आणि कोणत्या मात्रेनंतर तेच औषध विषारी किंवा प्राणघातक ठरू शकते, याचे आज आपल्याकडे असलेले ज्ञान त्या काळात पुरेसे विकसित झालेले नव्हते. त्यामुळे अनेकदा अक्षरशः ‘रोगापेक्षा इलाज जालीम’ अशी परिस्थिती निर्माण होत असे. रोग बरा करण्यासाठी केलेला उपचारच काही वेळा रुग्णासाठी अधिक त्रासदायक किंवा प्राणघातक ठरत होता. या पद्धतींविषयी अस्वस्थता आणि निषेध हॅनिमनपासूनच सुरू झाला, असेही नाही. हॅनिमनच्या आधीही अनेक विद्वान डॉक्टरांनी अशा उपचारपद्धतींविषयी प्रश्न उपस्थित केले होते. तत्कालीन वैद्यकाच्या आतूनच बदलाची गरज जाणवू लागली होती… आणि जेव्हा या सगळ्याचा…

Read More

होमिओपॅथीबद्दल बोलण्यासाठी आपण ज्या काळामध्ये होमिओपॅथीची निर्मिती झाली, तो काळ आधी समजून घेतला पाहिजे. कारण, त्या काळातील वैद्यक समजून घेतल्याशिवाय हॅनिमनने तत्कालीन उपचारपद्धतींना इतका तीव्र विरोध का केला, हे समजणे कठीण आहे. सर्वप्रथम एक गंमत लक्षात घेतली पाहिजे, आज आपण सर्रास वापरतो तो ‘ॲलोपॅथी’ हा शब्दच मुळात होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हॅनिमनने वापरात आणला आणि निश्चितच तो काही भूषणावह शब्द नव्हता. ग्रीक भाषेतील Allos म्हणजे ‘दुसरा किंवा भिन्न’ आणि pathos म्हणजे ‘दुःख किंवा रोग’. होमिओपॅथीच्या Similia — समानतेच्या तत्वापेक्षा वेगळ्या पद्धतीने उपचार करणाऱ्या तत्कालीन वैद्यकासाठी हॅनिमनने हा शब्द वापरला. पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. हॅनिमन ज्या ‘ॲलोपॅथी’वर…

Read More

बंगाल आणि दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातही होमिओपॅथी रुजण्यामागे काही विलक्षण व्यक्तींच्या कथा आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे विश्वेश्वर राय मंगेश कुलकर्णी. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, वयाच्या सुमारे सोळाव्या वर्षी ते गंभीर आजारी पडले. प्रचलित औषधोपचारांनी अपेक्षित फायदा झाला नाही. त्यावेळी फादर जेलोविट्झ नावाच्या एका जेसुइट धर्मगुरूंनी त्यांच्यावर होमिओपॅथिक उपचार केले आणि त्यातून त्यांना फायदा झाला, असे सांगितले जाते. पण गोष्ट तिथे संपली नाही… ज्या औषधांनी आपल्याला मदत केली ती नेमकी काय आहेत, याचे कुतूहल कुलकर्णींना स्वस्थ बसू देईना. त्यांनी फादर जेलोविट्झ यांच्याकडून होमिओपॅथी शिकण्यास सुरुवात केली, त्यांना कामात मदत केली आणि उपलब्ध होमिओपॅथिक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यातील…

Read More

होमिओपॅथीचा जन्म कसा झाला, तिच्यामागे कोणते वैद्यकीय आणि तात्त्विक विचार होते, हा स्वतंत्र आणि सखोल अभ्यासाचा विषय आहे. तो आपण पुढे कधीतरी पाहू. आजची आपली गोष्ट भारतापुरती ठेवूया. भारतातील होमिओपॅथीच्या इतिहासात सर्वप्रथम एक विलक्षण नाव समोर येते — डॉ. जॉन मार्टिन होनिगबर्गर. होनिगबर्गर हे ट्रान्सिल्व्हेनियातून आलेले वैद्य आणि प्रवासी होते. युरोप, मध्य-पूर्व आणि आशियातून प्रवास करत त्यांनी भारत गाठला. पंजाबमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि त्यांचा संबंध महाराजा रणजितसिंह यांच्या दरबाराशी आला. 1839मध्ये होनिगबर्गर पुन्हा लाहोरला आले. त्या काळात त्यांनी महाराजा रणजितसिंह यांच्यावर होमिओपॅथिक औषधाने उपचार केले. भारतीय होमिओपॅथीच्या इतिहासात हा प्रसंग महत्त्वाचा मानला जातो. पण भारतातील होमिओपॅथीची खरी…

Read More

संपूर्ण जगाच्या पाठीवर भारतासारखी संस्कृती शोधूनही सापडणे कठीण. या संस्कृतीचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे — तिने बाहेरून आलेल्या गोष्टी केवळ स्वीकारल्या नाहीत, तर त्या इतक्या आत्मसात केल्या की, कालांतराने त्या मूळच्या भारतीयच असाव्यात, असे आपल्यालाच वाटू लागले. आपल्या रोजच्या संगीतातली पेटी असो, तबला असो किंवा आपल्या जेवणातील अनेक पदार्थ असोत — आज आपण ज्यांना अगदी सहजपणे ‘आपले’ म्हणतो, त्यापैकी अनेक गोष्टींची पाळेमुळे भारताबाहेर सापडतात. पण त्या आपल्या जीवनात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, सण-समारंभांपासून दैनंदिन आयुष्यापर्यंत त्यांच्याशिवाय आपले पान हलत नाही. बाहेरून आलेली गोष्ट कुठून आली, यापेक्षा तिच्यातले चांगले काय आहे हे पाहणे, तिला स्वीकारणे, आपल्या गरजेनुसार तिच्यात बदल करणे…

Read More