Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!
सकाळीच एक उत्तर भारतीय जोडपं त्यांच्या दोन लहानग्यांसह ओपीडीत आलं होतं; त्यापैकी तिघांचं पोट बिघडलं होतं, मात्र सगळ्यात लहान सदस्य मजेत होता… “खाने में कुछ आया होगा,” म्हटल्यावर “सभी ने कल एक ही खाना खाया,” अशी माहिती मिळाली. मी सहज निरोगी सदस्याकडं मोर्चा वळवला आणि बघतो तर त्याला बोलता येत नव्हतं. मतिमंद… गतीमंद… स्वमग्न… नक्की सांगता येत नव्हतं; पण पोरगं खूश होतं अन् मुख्य म्हणजे तसं बाकी निरोगी दिसत होतं. “बिकलांग हैं सर” भैय्यानं माहिती दिली… “मतलब समझता हैं सब, लेकिन कमजोड हैं,” भैय्यीणीनं दुजोरा दिला. आपण किती लवकर ‘टॅग’ करतो ना एखाद्याला? शिकलेल्या माणसाला चटकन निदान होईना आणि थेट…
आमच्या ओपीडीत केबिनच्या दरवाज्यावर मोठ्या अक्षरात PULL आणि ओढा असे दोन्ही लेबल्स लावले आहेत, त्याखाली ओढणाऱ्या माणसाचे चित्रसुद्धा आहे. तरीही दिवसातून अनेक वेळा तो दरवाजा ढकलला जातो. एकदा, दोनदा नव्हे, तर अनेकदा आणि वर्षानुवर्षे! आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही. पुन्हा ढकलतात… मग मी आतून म्हणतो, “खाऽला,खिंचोऽऽ.” यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, “मैं तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना-लिखना नहीं आता…” मी अनेकदा विचार केला, ठीक आहे. अक्षरं वाचता येत नसतील, मग एकदा मी त्यांना चित्र दाखवलं… ओढणाऱ्या माणसाचं! पण उत्तर पुन्हा तेच, “मुझे क्या समझता? मैं तो…
एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्यापैकी तिला कालच्या औषधानं बरं वाटलं, पण त्याचा ताप कमी झाला नव्हता आणि त्याचा खडा सवाल होता – “असं झालंच कसं?” त्यांना जरा किंचित मागं घेऊन गेलो, तुम्हालाही नेतो… कोविडनं शिकवलं एक, पण आपण शिकलो दुसरंच! साल 2020 जग थांबलं होतं. विमानं जमिनीवर, रस्ते ओस पडलेले आणि प्रत्येक घरात एक नवीन तज्ज्ञ जन्माला आलेला ‘व्हॉट्सॲप विद्यापीठाचा सुवर्णपदक विजेता’! कोविडनं वैद्यकशास्त्राला एक गोष्ट पुन्हा ठळकपणे दाखवून दिली, ती म्हणजे विषाणू एकच… पण परिणाम हजार प्रकारचे! काहींना लक्षणंच नाहीत, काहींना दोन दिवस ताप, काहींना ऑक्सिजनची गरज लागली आणि दुर्दैवानं काहींना अतिदक्षता विभागात जावं लागलं… वैद्यकीय भाषेत हे…
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तोंडावरच पडलेला एक इसम ओपीडीत आला होता. घसरत गेल्यावर एक प्रकारचं फ्रिक्शन बर्न होतं, अर्थात इजा जळीतासारखी होते. त्यामुळं जखम बरी होणे आणि त्वचा पूर्ववत होणे याला वेळ लागतो, हे त्याला समजावून सांगितलं. “हातपाय मोडले असते तरी चाललं असतं, पण चेहऱ्याला लागायला नको होतं,” असं त्याचं म्हणणं पडलं. पण “थोडा वेळ जाईल पण नीट काळजी घेतली की, सर्व ठीक होईल” असं त्याला समजावून सांगितले तरी त्याचं फारसं समाधान झालं नाही. “शेवटी चेहराच फर्स्ट इम्प्रेशन असतो,” या त्याच्या म्हणण्यात तथ्य नव्हतं, असं नव्हे. पण तो गेला आणि इकडं मला प्रकर्षानं अमेरिकन सैनिक रिचर्डची आठवण झाली.. साल 1997…
अंगदुखीसाठी पन्नाशीच्या आसपासचे एक गृहस्थ ओपीडीत आले होते. बीपी थोडं वर असल्यानं त्यांना मी विचारलं… “नियमित कोणती औषधं सुरू आहेत?” तर ते म्हणाले, “बीपीच्या काही गोळ्या सुरू होत्या, पण बंद केल्या. यासंदर्भात तसा काहीच त्रास नाही.” “मग बीपीच्या गोळ्या कुणी आणि का सुरू केल्या होत्या?” – मी “एक दिवस छातीत थोडं दुखलं… अपचन गॅसेसही होते… तडक डॉक्टरांकडे गेलो ते म्हणाले, ”बीपी नॅार्मल आहे, पण काही तपासण्या करू.” ते रिपोर्ट बघून अँजिओग्राफीही केली. तीही नॉर्मल आली… पण गोळ्या चिटकल्याच, सवय लागेल म्हणून मीच बंद केल्या!” ‘सवय लागेल’ म्हणून औषधं बंद करणारी किंवा न घेणारी आणि भारंभार वाईट सवयी असणारी ही प्रजाती…
एक जोडपं ओपीडीत आलं होतं. तिला ॲसिडिटी आणि डोकेदुखीचा त्रास होता… जुजबी पूर्वइतिहास विचारून, सगळे पॅरामीटर्स चेक करत तिला लक्षणजन्य औषधं दिली… पण दोघांच्या काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या. “काही विचारायचं का?” मीच त्यांना विचारलं, तेव्हा “काही नाही डॉक्टर ही म्हणते तुम्हीही औषध घ्या,पण मला काही झालेलं नाही,” त्यानं हसत सांगितलं. “झालं नाही कसं? परवा कार्डिओलॅाजिस्टकडं जाऊन आले. ईसीजी केला होता… काल डायलमध्ये मी न्युरोचा नंबर बघितला…” तिनं तक्रार नोंदवली. “ठीक आहे, औषधं नका घेऊ… अगदी WHOत जाऊन दाखवा, पण एकदा सांगा तरी काय तक्रार आहे?” मी त्याला थोडं कम्फर्टेबल केलं. “काही नाही ओ डॅाक्टर, डोळे आणि नाक चुरचुरायचे म्हणून एका…
वैद्यकीय व्यवसायात दिवसाची सुरूवातच संवादानं होते… “काय होतंय? कधीपासून होतंय?” थोड्या वेळापूर्वी समोर एक तरुण त्याच्या आईसोबत येऊन बसला होता एकदम चिडीचूप… कदाचित तो विचारात असावा किंवा आजारपणामुळं गप्प असावा, असा माझा समज झाला अन् त्याचा मरगळलेला मूड बदलावा आणि त्यानं मनमोकळं बोलावं, या हेतूनं मी थोड्या हक्कानं आणि उत्साहानं म्हणालो, “अहो… बोला की!” पुढच्याच क्षणी त्याच्या आईनं खाली मान घालून अत्यंत क्षीण आवाजात उत्तर दिलं, “त्याला बोलता येत नाही डॉक्टर…” तो क्षण… आणि त्या ठिकाणी पसरलेली ती नीरव शांतता काळजाचा ठोका चुकवून गेली… माझ्या उत्साही स्वराचा प्रतिध्वनी मलाच अपराधी वाटू लागला… मी ज्याला ‘मूड’ समजत होतो, ते तर त्याचं…
सकाळीच ओपीडीत एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ आले. व्यवस्थित कपडे, देहबोलीत आत्मविश्वास… “डॉक्टर, बाकी सगळं ठीक आहे, फक्त रिपोर्टमध्ये थोडी साखर वाढलेली दाखवली आहे…” त्यांनी माझ्या हातात त्यांचे रिपोर्ट सुपूर्द करत सांगितलं. मी रिपोर्ट पाहिला Fasting, PP, HbA1c सगळेच स्पष्टपणे मधुमेहाकडं इशारा करत होते. “तुम्हाला डायबिटिस आहे,” मी शांतपणं सांगितलं. ते लगेच हसले, “नाही नाही डॉक्टर, आमच्या घरात कुणालाच नाही. मी चालतो-फिरतो, काम करतो मला डायबिटिस कसा असेल?” इथे सुरू झाली एक वेगळीच कथा… ही होती Denialची (नाकारण्याची) आणि त्यामागं लपलेली मानसिक प्रक्रिया Self-Serving Bias… Self-Serving Bias म्हणजे काय तर फक्त आपल्याला अनुकूल असलेली माहिती स्वीकारणं आणि नको असलेली माहिती नाकारणे!…
सकाळीच ओपीडीत एक तरुण आई आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती… म्हणाली, “डॉक्टर, खोकला आहे, पण औषध नको! प्लस तुमची फी देते, पण काही घरगुती उपाय असेल तर सांगा.” “का? औषधं का नको?” मी हसत विचारलं. “औषधांमध्ये केमिकल्स असतात ना! साइडइफेक्ट्स होतात प्लस सवय लागते… घरगुती उपाय, नैसर्गिक असतात तेच सेफ…”- माऊली पुटपुटली. इथं सुरू झाला एक परिचित, पण गुंतागुंतीचा विषय ‘Natural Fallacy’! ‘Natural Fallacy’ म्हणजे नैसर्गिक तर्कदोष; “जे नैसर्गिक आहे, तेच चांगलं आणि सुरक्षित आहे आणि जे औषध आहे ते कृत्रिम आणि त्यामुळं धोकेदायक” असा समज. हा विचार ऐकायला अत्यंत आकर्षक वाटतो, पण नेहमीच खरा असतो का? हेही…
“डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम बोललं जातं; ‘भूक लागत नाहीये’ म्हणजे काय? जेवावसं वाटत नाही? खाल्लं की पोट गच्च होतं? थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं? इच्छा होते, पण जात नाही की भावनाच उडाली? संकल्पनात्मक पातळीवर हे वाटतं तितकं सहज साधं प्रकरण नाही… आपल्याला भूक लागत नाही म्हणजे नेमकं काय होतं? कधीपासून सुरू झालं? त्याचे शरीरावर काय परिणाम झाले? याची ढोबळ का होईना कारणमीमांसा गरजेची असते. पेशंट जेव्हा म्हणतो, “भूक लागत नाही” तेव्हा डॉक्टरच्या डोळ्यांसमोर फक्त रिकामं ताट नसतं, तर तो मेंदू-पोट-संप्रेरके-भावना यांचा गुंतागुंतीचा खेळ उलगडत असतो. भूक न लागणं…

