Author: दीपक तांबोळी

Avatar photo

निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

भाग – 1 “आई खूप आनंदाची बातमी आहे. मला 98 टक्के मिळाले,” आईला मिठी मारत मानस म्हणाला. सुनीताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. “खूप खूप अभिनंदन बेटा. तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर… त्यांनाही खूप आनंद होईल.” मानसने लगेच सुभाषला फोन लावला आणि आपला रिझल्ट सांगितला. “अरे वा, खूप मस्त! अभिनंदन बेटा. मी आलोच घरी,” सुभाष म्हणाला. मानस हा सुभाष-सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळावे, यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला ॲडमिशन करून दिली होती. खरंतर, दोघांच्या खासगी नोकऱ्या. क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती, तरीसुद्धा स्वतः वर्षभर…

Read More

भाग – 3 मेसचा डबा न आल्याने चव्हाण नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते. तेव्हा कुलकर्णी आणि त्यांची पत्नी मंजूने त्यांना आपल्याच घरी जेवणासाठी येण्याचा आग्रह केला. चव्हाण नाखुशीनेच त्यांच्याकडे जेवायला गेले. पण त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. पोळ्या तर इतक्या छान होत्या की, त्यांच्याकडे पाहूनच भूक वाढत होती. कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं. स्वतःच्या नकळत ते जेवणावर तुटून पडले. काही दिवसांनी कुलकर्णींच्या ओळखीने त्यांच्या गावची दोन मुले चव्हाणांकडे राहायला आली. युपीएससीच्या कोर्सेससाठी आलेली ही मुले त्यांना भाडं देणार होते. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. चव्हाणांना त्यांचा काहीच त्रास नव्हता. उलट, चहा प्यायला…

Read More

भाग – 2 मेसचा डबा न आल्याने चव्हाण 15 वर्षांत पहिल्यांदाच नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते. तेव्हा कुलकर्णी आणि त्यांची पत्नी मंजूने त्यांना आपल्याच घरी जेवणासाठी येण्यचा आग्रह केला. ऑफिसमधल्या कुलकर्ण्यांकडे एकदा ते जेवायला गेले होते. कसलं मिळमिळीत आणि बेचव जेवण ते! तेव्हापासून कुलकर्णी आडनावाच्या माणसाकडचं काहीही खायचं नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. पण चव्हाण नाखुशीनेच त्यांच्याकडे जेवायला गेले. “करा काका सुरुवात,” कुलकर्णी म्हणाले तसा त्यांनी अनिच्छेनेच घास घेतला. त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी दुसऱ्या भाजीचीही चव घेतली. तिचीही चव सुरेख होती. पोळ्या तर इतक्या छान होत्या की, त्यांच्याकडे पाहूनच भूक वाढत होती. कितीतरी…

Read More

भाग – 1 “कुलकर्णी, अहो कुलकर्णी…” चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली, तसं कुलकर्णींनी दार उघडलं. “या या चव्हाण काका. कसं काय येणं केलंत?” “अहो, तुमच्या ओळखीचा कुणी घरगुती मेसवाला आहे, जो घरी डबा पाठवू शकेल?” “माझ्या परीचयाचा तर कुणी नाही, पण मंजूला माहीत असेल. ती आता आंघोळीला गेलीये. तुम्ही या ना… आत बसा. येण्यातच आहे ती…” चव्हाण आत जाऊन बसले. कुलकर्णी आणि त्यांचा पंधरा वर्षांचा शेजार. पण आज ते पहिल्यांदाच त्यांच्या घरात बसले होते. त्यांनी घरभर नजर टाकली. त्यांच्या दोन मजली बंगल्याच्या मानाने खूप लहान घर असलं तरी चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं. “का तुमचा डबेवाला आज येणार…

Read More

उत्तरार्ध पांडुरंग माळी सरांच्या सांगण्यावरून चेतन शेलार प्रसिद्ध लेखक सुधाकरराव शिर्के यांच्याकडे आला होता. त्याने लिहिलेल्या कथांसाठी त्याला सुधाकररावांकडून प्रस्तावना हवी होती. पण सुधाकरराव नवोदितांच्या प्रस्ताव देत नसत. पण माळी सरांकडून चेतन आल्याने त्यांनी त्याच्या कथा ठेवून घेतल्या. पांडुरंग माळी त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र. आठवडा उलटून गेला तरी सुधाकररावांनी चेतनच्या कथांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नवख्या लेखकाच्या कथा कचऱ्यात टाकायच्या लायकीच्याच असतात, असं त्यांना वाटत होतं. आठव्या दिवशी आलिशान गाडीतून छाबरीया इंडस्ट्रीजची चेअरमन आरती छाबरीया आली आणि तिने आपल्या नव्या कवितासंग्रहासाठी सुधाकरराव यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि 25 हजार रुपयांचा चेक त्यांनी मानधन म्हणून दिला. आपल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला ते पुस्तक…

Read More

पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण म्हणाला. “ये ये बैस…” सुधाकरराव शिर्केनी त्याला आत बोलावलं. चेतन आत येऊन अवघडून बसला. सुधाकररावांनी त्याचं निरीक्षण केलं. साधारण 24-25 वर्षांचा तरुण दिसत होता. प्रथमदर्शनी चेतनबद्दल त्यांचं मत काही फारसं चांगलं झालं नाही. “हं बोल, कशाकरिता येणं केलसं?” खरं तर तो कशासाठी आलाय हे त्यांना चांगलंच माहीत होतं. माळी सरांनी त्यांना चेतनबद्दल सर्व कल्पना देऊन ठेवली होती. “सर, मी काही कथा लिहिल्या आहेत, त्यांचा कथासंग्रह करायचा विचार आहे. आपली प्रस्तावना हवी होती मला त्यासाठी…” “अगोदरचं काही साहित्य प्रकाशित झालंय?” “नाही सर. हा पहिलाच कथासंग्रह आहे.”…

Read More

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली. काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता. “आज तरी चांगली कमाई व्हायला पाहिजे,” असे मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी, पालक, भोपळा, भेंडी, मिरची, कोथिंबीर…” असं ओरडत गल्ल्यागल्ल्यांतून फिरू लागली. पाय चालत होते, पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती… नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती. दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला घरी आणून टाकलं होतं. जावयाची तिनं खूप मनधरणी केली होती. त्याच्या पाया पडली… जावई थोडा नरमला. पण…

Read More

“अण्णा आज लवकर फिरून आलात? आणि हे काय तुमची तर आंघोळही झालेली दिसतेय?” मनोजने उठल्यावर वडिलांना विचारलं. “अरे, आज गुढीपाडवा ना! म्हणून आजचा मॉर्निंग वॉक थोडा लवकर आटोपला. येताना कडूनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पुजेला. आज मीच पूजा करणार आहे. सुनबाई उठली का?” “नाही अजून. आज सुटी आहे ना शाळेला, म्हणून थोडं उशिरा उठेल.” “बरं, झोपू दे.” अण्णा पुजेला गेले. एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पूजा करायचे नाहीत, आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती. मनोज बेडरूममध्ये गेला. विद्या आणि मुलं गाढ झोपली होती. सात वाजले होते. सणासुदीला लवकर उठावं, असं अण्णांचं…

Read More

वडील वारले त्यावेळी सचिन फक्त पंधरा वर्षांचा होता. पाठोपाठ आईसुद्धा देवाघरी गेली. 13 वर्षांच्या रंजनाची आणि 11 वर्षांच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली.  नोकरी करता-करता त्याने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. फॅक्टरीत मूळ मालक गेल्यानंतर त्याच्या मुलांनी ताबा घेतला आणि सचिनचा पगार वेळेवर मिळणे बंद झालं. सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं. वडिलांनी ते एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं होतं. शब्दाला जागण्याचा तो काळ होता. त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही. पण मित्राच्या निधनानंतर त्याचे घरभाडे येणे बंद झालं. मग सुरू झाल्या कोर्टकचऱ्या! हायकोर्टात सचिन खटला जिंकला. सचिनने एका बिल्डरला गाठून ते घर दीड कोटीला विकले. बहिणींना कोर्टात यावं…

Read More

चपला काढून जसा सचिन घरात शिरताच, त्याच्या बायकोने, सुचिताने एक पाकीट त्याच्या हातात दिलं. “काय आहे हे?” त्याने विचारलं. “काय माहीत! रजिस्टर पोस्टाने आलंय. कुणा वकिलाचं दिसतंय…” वकील म्हटल्याबरोबर सचिनच्या पोटात खड्डा पडला. त्याने घाईघाईने पाकीट उघडून आतलं पत्र बाहेर काढलं. पत्राच्या उजव्या बाजूला वरती ॲड. सुचित्रा पाटील असं लिहिलेलं होतं. खाली त्याच्या जुन्या घराचं सविस्तर वर्णन होतं आणि त्याखालचा मजकूर असा होता – “वरील मिळकत वडिलोपार्जित असून आपण वर्ष 2003 साली बनविलेल्या मुख्त्यारपत्रानुसार या मिळकतीची परस्पर विक्री केली आहे. हिंदू कौटुंबिक कायद्यानुसार आपल्या बहिणी, अनिता आणि रंजना यांचा या मिळकतीवर समान हक्क असतानाही आपल्या बहिणींना विश्वासात न घेता किंवा…

Read More